Saturday, July 26, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सच्या ‘सुर्या’ला ग्रहण, दुखापतीमुळे IPL मधून बाहेर!

मुंबई इंडियन्सच्या ‘सुर्या’ला ग्रहण, दुखापतीमुळे IPL मधून बाहेर!


आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मोसमातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. सोमवारी (9 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमारच्या दुखापतीची बातमी समोर आली. सुर्यकुआमच्या अंगठ्याला झालेल्या दुखापत झाल्याने तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकला होता. त्यानंतर तो संघात सामील झाला होता. पण पुन्हा एकदा दुखापत झाल्याने त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे.

आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव डाव्या हाताच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे टाटा आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. 6 मे 2022 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध संघाच्या सामन्यात यादव जखमी झाला होता.’ (Suryakumar Yadav)

आयपीएलच्या चालू हंगामात सूर्यकुमारला केवळ आठ सामने खेळता आले. संघाच्या पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकला नाही. या मोसमात त्याने तीन अर्धशतके झळकावली, पण मुंबई संघाच्या कामगिरीत त्याला सुधारणा करता आली नाही. 10 पैकी 8 सामने गमावून मुंबईचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

आयपीएलच्या चालू मोसमात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आठ सामन्यांत 303 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 43.29 आणि स्ट्राइक रेट 145.67 होता. तिलक वर्माने मुंबई संघासाठी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -