Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रडाक सेवकाने खातेदारांचे २५ लाख लाटले

डाक सेवकाने खातेदारांचे २५ लाख लाटले

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे पदाचा गैरवापर करत ५२ खातेदारांचे २५ लाख १३ हजार २१३ रुपये घेऊन ते खात्यात न भरता फसवणूक केली. याप्रकरणी डाक सेवकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०१० ते ७ मे २०२२ या कालावधीत घडली आहे.

सचिन शशिकांत पवार (रा. चरवेली, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डाक सेवकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात गणपत सीताराम राणे (वय ५७, रा. लांजा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चरवेली येथील डाकघर शाखेत डाक सेवक असलेल्या सचिन पवारने आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने चरवेली परिसरातील ५२ खातेदारांकडून २५ लाख १३ हजार २१३ रुपये घेऊन ते खातेदारांच्या खात्यात न भरता अपहार करत फसवणूक केली. तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -