गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भुमिकेबद्दल महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चा होत आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून अनेक वाद सुरू आहेत. पक्ष संघटनावरही राज यांच्या नव्या भूमिकेचा परिणाम बघायला मिळत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मनसे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना दिलेल्या धमकीच्या पत्रात नमूद केली होती. तसेच राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे. आणि हाच उर्दू शब्दांचा उल्लेख महत्वाचा असणार आहे.
बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे की, मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू.
राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमक्यांचे फोन आले होते. त्यानंतर आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनाही धमक्या आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. याच धमकीच्या पत्रात राज ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भोंग्यांबाबतच्या भूमिका थांबवावी असं पत्रात म्हटलं असल्याचंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.