रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.. मोदी सरकारने रेशन कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य केलं आहे. रेशन कार्ड जर आधार नंबरशी लिंक केलेलं नसेल, तर स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य घेण्यात अडचणी येऊ शकतात.
रेशन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी मोदी सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत अनेक जणांना रेशन कार्ड हे आधारला लिंक करता आले नाही. अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारने आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार आता रेशन कार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनही रेशनकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक केलेलं नसेल, तर तातडीने हे काम करुन घ्या.. अन्यथा अडचण येऊ शकते.. हे काम अगदी घरबसल्याही करता येणार आहे.. ते नेमकं कसं करायचं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
रेशन कार्ड असं करा ‘आधार’शी लिंक
• सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
• इथे ‘Start Now’ या बटणावर क्लिक करा.
• नंतर तुमचा पत्ता, जिल्हा, राज्य याची माहिती भरा
• नंतर ‘Ration Card Benefits’ वर क्लिक करा.
• इथे आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल, मोबाइल नंबर आदी डिटेल्स भरा.
• नंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ‘ओटीपी’ (OTP) येईल. तो टाका
• त्यानंतर स्क्रिनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
• नंतर आधार वेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.
ऑफलाईन पद्धतीनेही तुम्हाला रेशनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्डची झेरोक्स आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जमा करा.
दरम्यान, देशातील कोट्यवधी नागरिकांना रेशनकार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य मिळावे, यासाठी मोदी सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना सुरु केली. रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर नागरिकांना या ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही ठिकाणी स्वस्त धान्य घेता येणार आहे.