Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आणणे काळाची गरज

कोल्हापूर : संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आणणे काळाची गरज

छत्रपती संभाजी महाराज भाषा, धर्मपंडित, कुशल राजकारणी, नेतृत्व, चारित्र्यसंपन्न होते; परंतु संभाजी महाराज यांची वेगवेगळ्या पद्धतीने आजही बदनामी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा खरा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक, वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

संयुक्त् छत्रपती संभाजीनगर (उपनगर) यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या सान्निाध्यात संभाजी महाराज सर्व गोष्टीत तरबेज झाले. अध्यात्म, राजकारणासह विविध विषयांवरील ग्रंथ त्यांनी लिहिले. कमी वयात युद्धमोहिमांचे नेतृत्व करीत शौर्याने संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या सीमा वाढवत नेल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिताच्या प्रत्येक जबाबदार्यार त्यांनी पार पाडल्या.

प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून योजना आखणे, त्याचे नियोजन करणे व अभ्यास करून त्याच्यावर विजय संपादन करणे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या यशाचे सूत्र होते. शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यास लाभलेले ते छत्रपती होते. इतिहास अभ्यासक, संशोधकांनी संभाजी महाराज यांचा इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -