Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगआनंदवार्ता! 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होणार

आनंदवार्ता! 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होणार

उष्णतेच्या लाटेमुळे आणि वाढत्या गर्मीमुळे हैराण झालेल्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदवार्ता आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. ‘असानी’ चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सूनचे आगमन जरा लवकरच होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून वेळेआधीच अंदमानमध्ये (Andaman) दाखल होण्याची शक्यता आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. पण यावर्षी चार दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत मान्सून दाखल होईल तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील ट्वीट करत अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यावर मान्सून पुढच्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. अशामध्ये मुंबईमध्ये देखील मान्सूनला निमंत्रण देणारी अनुकुल परिस्थिती निर्माण होत आहे. मुंबईमध्ये देखील मेअखेरीस पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दरवर्षी मुंबईत सर्वसाधरपणे 11 जूनला मान्सून येतो. पण यावेळी असानी चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये मान्सूनसाठी पूरक असे ढग तयार होत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -