Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : एकीकडे गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू, तर दुसरीकडे गव्यांच्या हल्ल्यात घोड्याचा...

कोल्हापूर : एकीकडे गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू, तर दुसरीकडे गव्यांच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दोन गव्यांच्या झालेल्या झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना बाजारभोगाव व पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा ) गावांच्या हद्दीवर घडली. तर पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे येथे गव्याच्या हल्ल्यात धनगरांच्या घोड्याचा मृत्यू मृत्यू जाहला आहे.
दरम्यान. गव्यांच्या झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू झाला आहे. तानाजी सावू पाटील (रा. पोहाळे) यांच्या शिव नावाच्या शेतात आज सकाळी गवा मृतावस्थेत आढळला. शिंग लागल्यामुळे अंगावर जखमा झाल्याचे स्पष्ट दिसत होते. तर झुंजीमुळे शेतातील सुमारे पाच गुठे क्षेत्रातील ऊसाचे नुकसान झाले आहे.
पहाटे चारच्या सुमारास शिव नावाच्या आनंदा गणपती पाटील (रा. पोहाळे) यांच्या ऊसाच्या शेतात गव्यांची झुंज सुरू झाली. त्यांच्या ऊसाच्या शेताचे नुकसान करत गवे तानाजी पाटील यांच्या शेतात पोहोचले. झुंजीमुळे त्या ठिकाणचा ऊस भुईसपाट झाला आहे. सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाच्या पिकाची नासधूस झाली आहे. या दोन गव्यांच्या झुंजीत एक गवा मृत्यूमुखी पडला. आज सकाळी शेतीकामासाठी आलेल्याशेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आ त्यांनी तात्काळ वनकर्मचाऱ्यांना ही माहिती दिली.



वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलीक कांबळे, महादेव कुंभार, संगिता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आढळल्या. सुमारे आठ ते नऊ वर्षाचा पूर्ण वाढ झालेला हा गवा झुंजीत मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या गव्याला पाहण्यासाठी अबाल वृध्दांनी गर्दी केली होती. मुख्य रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर ऊसात असणाऱ्या या गव्याला पाहण्यासाठी महिला वर्गानेही हजेरी लावली होती. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी रोहीत रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली.

गव्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे गव्याच्या हल्यात धनगरांच्या घोड्याचा मृत्यू झाला आहे. वाघवेच्या डोंगरात गेल्या अनेक दिवसांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरु होता. त्यामुळे नागरिकांसह, पाळीव प्राण्यांना इजा होईल अशी भीती होती. अखेर या गव्याच्या हल्ल्यात एका धगराच्या घोड्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -