Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : दोन मुलांना विष पाजून आईने केली आत्महत्या

धक्कादायक : दोन मुलांना विष पाजून आईने केली आत्महत्या

सोलापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेनूर गावामध्ये राहणाऱ्या प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियांकाने आधी आपल्या पोटच्या दोन मुलांना विष पाजले. त्यानंतर प्रियांकाने आत्महत्या केली. या घटनेमध्ये प्रियांकाचा मृत्यू झाला. प्रियांकाच्या सात महिन्याच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाला. तर चार वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सोलापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घरगुती वादातून प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये सतत घरगुती वाद सुरू होत होते. याच वादाला कंटाळून प्रियांका चवरेने हे टोकाचे पाऊल उचलत आपल्या मुलांना विष पाजले आणि स्वत: आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांका आणि तिच्या दोन मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण प्रियांका आणि तिच्या सात महिन्याच्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर प्रियांकाच्या चार वर्षांच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास सोलापूर पोलिसांकडून सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -