देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका मुलीवर अॅसिड फेकल्याप्रकरणी आरोपीला थेट तामिळनाडूतील एका आश्रमातून अटक करण्यात आली आहे. या आश्रमात हा आरोपी साधूचा वेश धारण करुन राहत होता. नागेश असं आरोपीचं नाव आहे. मुलीवर | अॅसिड हल्ला केल्यानंतर तो आरोपी फरार झाला होता. पकडण्यासाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती.
प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने एका मुलीवर अॅसिड हलला केला होता. ही घटना 28 एप्रिलला नागपूर कामाक्षीपाल्या परिसरात घडली. आरोपी नागेश एक कड्यांची कंपनी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश हा त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. मुलीने त्याला दिलेल्या नकारानंतर संतापात त्याने त्याच मुलीवर अॅसिड हल्ला केला.