ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री केतकी चितळेला अखेर ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळेने (political parties) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर केतकीविरोधात कळवा, ठाणे, बीड आदी ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राज्यात अनेक भागात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. केतकीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. तसंच केतकीवर कारवाई होणारच असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेने (political parties) शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत खुद्द पवारांनाच विचारलं असता कोण केतकी चितळे माहिती नाही. तिने माझ्याबाबत काय लिहिलं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिलीय.
केतकी चितळेची पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट काय?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll