Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानगुगल-पे, फोन-पेद्वारे ‘एटीएम’मधून ‘कॅश’ काढता येणार, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया..!

गुगल-पे, फोन-पेद्वारे ‘एटीएम’मधून ‘कॅश’ काढता येणार, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया..!

स्मार्टकार्डच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे.. आतापर्यंत तुम्ही एटीएम कार्डच्या साहाय्याने ‘एटीएम’ केंद्रातून रोख पैसे काढले असतील. मात्र, आता तुमच्याकडे कार्ड नसले, तरी तुम्हाला ‘एटीएम’मधून कॅश काढता येणार आहे..

आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोन-पे, गुगल-पे, पेटीएम सारखी ‘युपीआय’ अ‍ॅप्स आहेत. आतापर्यंत या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पेमेंट केले जात होते. मात्र, आता या अ‍ॅपच्या साहाय्याने कार्ड नसले, तरी तुम्हाला ‘एटीएम’ केंद्रावर रोख पैसे काढता येणार आहेत. त्यासाठी लवकरच ‘एटीएम’ अपग्रेड केले जाणार असल्याची माहिती ‘एनसीआर कॉर्पोरेशन’तर्फे देण्यात आली.

युपीआय प्लॅटफॉर्मद्वारे ‘इंटरपोर्टेबल कार्डलेस कॅश विथड्राव्हल’ करता येतं. म्हणजेच, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नसले, तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

‘युपीआय’ अ‍ॅपच्या साहाय्याने पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन ‘युपीआय सर्व्हिस अनेबल्ड’ असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येणार नाही.

मोबाइलमध्ये युपीआय बेस्ड गुगल पे (Gpay), फोन पे (PhonePe), अ‍ॅमेझाॅन पे (Amazon Pay), पेटीएम (Paytm) यापैकी कोणतंही एक अ‍ॅप असायला हवं.
या फीचरचा वापर करण्यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन ‘अ‍ॅक्टिव्ह’ असायला हवं.

असे काढा पैसे…?

वरील बाबी चेक केल्यानंतर एटीएममध्ये जाऊन ‘विथड्राव्हल कॅश’ हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
नंतर एटीएम मशीनच्या स्क्रिनवर ‘युपीआय’चा ऑप्शन सिलेक्ट करावा.

तुम्हाला ‘एटीएम’च्या स्क्रिनवर क्यूआर कोड दिसेल. ‘युपीआय’ अ‍ॅपमध्ये जाऊन तो ‘क्युआर कोड’ स्कॅन करा.
तुम्हाला किती रक्कम काढायची आहे, ती टाका. सध्या या पद्धतीने पैसे काढण्यासाठीचे लिमिट 5 हजार रुपये आहे.
‘क्युआर कोड’ स्कॅन झाल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा व ‘युपीआय पिन’ टाका. तुम्हाला एटीएममधून तुम्ही टाकलेली रक्कम मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -