मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दोऱ्यावर आहेत.त्याच दरम्यान येत्या 21 मे रोजी राज ठाकरे हे पुण्यात जाहीर सभा घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या झालेल्या सभा आणि त्यासभेत त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं.
त्यामुळे आता 21 मे रोजी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील.पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरेंनी सभा घेण्यासाठी काहीही हरकत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नदीपात्राच्या जागेत 21 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या संदर्भात परवानगी मिळावी म्हणून पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलिसांना पत्र दिलं आहे. यानंतर पोलिसांनी या जागेची पाहणी सुद्धा केली.या संदर्भात पुण्याच्या पोलिसांनी सागितले, अदयाप परवानगी दिलेली नाहीये, परवानगी विचाराधीन आहे. या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानसार परवानगी देण्यात येईल.






