Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगपुढील 3 दिवस ‘या’ 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट; पाऊस धो धो बरसणार

पुढील 3 दिवस ‘या’ 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट; पाऊस धो धो बरसणार

सध्या महाराष्ट्रात भयंकर उकाड्याचे वातावरण आहे. एका बाजूला पाऊस आणि दमट वातावरण तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. दरम्यान आता काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण झालेले आहे.

पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे.

 

मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, आधी तो केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये साधारण 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

येत्या काही तासांत राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यांत हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -