Friday, December 19, 2025
Homeब्रेकिंग‘या’ राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; ट्रेन बुडाली, अनेक मृत्यू तर 20 जिल्हे...

‘या’ राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; ट्रेन बुडाली, अनेक मृत्यू तर 20 जिल्हे बाधित

एका बाजूला उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे तर दुसऱ्या बाजूला मान्सूनपूर्व पावसाचा (Pre-Monsoon Rain) दणका बसला आहे. आसाममध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार मांडला असून आतापर्यंत जवळपास 24 जिल्हे प्रभावित झालेले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे (Floods and landslides) 20 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2 लाख लोकांचे सामान्य जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत असून त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.

पुरात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 33 हजार लोक मदत शिबिरात आहेत. राज्याचा रेल्वे संपर्क तुटला असून, वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. आसाममधील लुमडिंग-बदरपूर विभाग हा त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामचा दक्षिण भाग देशाच्या इतर भागांशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. गेल्या चार दिवसांपासून हा रेल्वे संपर्क तुटल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.

24 जिल्ह्यांतील 811 गावांमध्ये 2,02,385 लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे 6,540 घरांचे अंशतः आणि पूर्णपणे नुकसान झाले आहे. 33,300 हून अधिक लोकांनी 72 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, तर जिल्हा प्रशासनाने 27 मदत वितरण केंद्रे उघडली आहेत. कचार, दिमा हासाओ, होजाई आणि चरैदेव हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात 26 मे ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. 20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 26 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -