Thursday, December 18, 2025
Homeक्रीडाआयपीएलचा अखेरचा सामना पण कर्णधारचं नसणार !

आयपीएलचा अखेरचा सामना पण कर्णधारचं नसणार !

सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा कर्णधार केन विलियमसन आपल्या संघासाठी अखेरचा लीग सामनाही खेळू शकणार नाही. आयपीएल स्पर्धा (IPL)अर्धवट सोडून केन आपल्या मायदेशी परतला आहे. २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. या दोन्ही संघांतील लढत या सत्रातील अखेरची असेल.मिळालेल्या माहितीनुसार, केन विलियमसन हा दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या व्यवस्थापनानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता. आता २२ मे रोजी हैदराबादची या फेरीतील अखेरची लढत पंजाबविरोधात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रातील हा अखेरचा सामना असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -