Monday, February 23, 2026
HomeमनोरंजनBagheera : KGF नंतर मोठी घोषणा, 'बघीरा' बॉलिवूडला देणार धक्का

Bagheera : KGF नंतर मोठी घोषणा, ‘बघीरा’ बॉलिवूडला देणार धक्का

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सुपरहिट केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी मोठी घोषणा केली असून साऊथचा आणखी एक चित्रपट बॉलिवूड धक्का देण्यास तयार आहे. ‘बघीरा’ (Bagheera) असे या नव्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा अभिनेता श्री मुरली असेल. तो आधी ‘उग्राम’ चित्रपटात दिसला होता. दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत.



ट्विटरवरून यशचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट KGF Chapter २ च्या निर्मात्यांनी त्यांच्या या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. प्रोडक्शन हाऊस होंबळे फिल्म्सने शुक्रवारी घोषणा केली की ते नवीन कन्नड अॅक्शन फिल्म बनवणार आहोत. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चित्रपटाचे स्टार आणि दिग्दर्शक सुरी मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. यासोबतच चित्रपटाच्या क्लॅप बोर्डचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. बघीरा चित्रपटाच्या टीमला प्रशांतने शुभेच्छा दिल्या आहेत. बघीरा या चित्रपटाचे शूटिंग कर्नाटक आणि हैदराबादमध्ये होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -