Monday, February 23, 2026
Homeब्रेकिंगसर्वसामान्यांना झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर

सर्वसामान्यांना झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनतेचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. त्यात या नाही तर त्या गोष्टींच्या किमती सतत वाढत चालल्या आहेत. अशामध्ये इंधन दरवाढीचे (Fuel price hike) तर सत्र सुरुच आहे. आता सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा वाढ (CNG price hike) झाली आहे. राजधानी दिल्ली (Delhi) आणि पुण्यामध्ये (Pune) सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर (Delhi NCR) आणि आसपासच्या शहरांमध्ये सीएनजीचे दर वाढले आहे. दिल्लीमध्ये 2 रुपयांनी सीएनजीचे दर वाढले आहे. तर राज्यातील पुणे शहरात सीएनजीचे दर वाढले आहे. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरामध्ये देखील सातत्याने वाढ होताना पहायला मिळत आहे



सीएनजीच्या दरवाढीनंतर आता दिल्लीमध्ये प्रति किलोग्रॅम सीएनजीसाठी ग्राहकांना 78.17 रुपये मोजावे लागणार आहे. तर पुण्यामध्ये प्रति किलोग्रॅम सीएनजीसाठी ग्राहकांना 80 रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा सीएनजी गाड्या (CNG vehicle) खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. ते आपल्या गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवत आहेत. अशामध्ये आता पेट्रोल-डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरामध्ये देखील सतत वाढ होत चालली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -