Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : विद्युत तारेस स्पर्श होऊन तीन मेंढ्यांचा मृत्यू

कोल्हापूर : विद्युत तारेस स्पर्श होऊन तीन मेंढ्यांचा मृत्यू

सिद्धनेली ता. कागल येथील किरण मगदूम यांच्या शेताशेजारील रस्त्यावरील लाईट डांबावरील तारा एकमेकांस चिकटलेने लाईट खांबास व रोपतारेस करंट आलेने चरत असलेल्या मेढ्यांचा स्पृश झालेले तीन बकरी(मेंढ्या) मूर्तमुखी पडल्याची बातमी समजताच महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे सिद्धने जिल्हाध्यक्ष राघू हजारे तात्काळ घटनास्थळी हजर होऊन सिद्धनेर्ली चे पोलीस पाटील उध्दव पोतदार व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे तालुका लाईट अभियंता अभिलाश बारापत्रे, वायरमन उदय भासुरे यांना बोलावून या घटनेची रितसर तक्रार दिली.

तालुका पशुसंवर्धन अधिकारी धनवट व टि आर माने यांनी पोस्टमार्टम करुण त्याचा रिपोर्ट देऊन पंचनामा करुन घेण्यात आला. शिवाजी भिकू तांदळे या सिध्दनेर्ली येथील मेंढपाळची दोन गाभन मेंढ्या व एक मेंढी असा अंदाजे चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

तरी झालेले आर्थिक नुकसानाची भरपाई तात्काळ मिळावी अशी हि मागणी अभिय महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघु हजारे यांनी केली आहे. यावेळी तानाजी हजारे , मारुती तांदळे, रामदास हजारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -