ताजी बातमी ऑनलाईन टीम
खेड ; तोंडावर आला तरीही पावसाळी कामांनी वेग घेतलेला नसल्याच्या तक्रारी आहेत. ही कामे आतापर्यंत पूर्ण झालेली नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही गोडोली परिसरातील
दुकानगाळे, हॉल व नागरिकांच्या घरात पाणी शिरुन लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. गोडोलीकरांवर पूरस्थितीची टांगती तलवार असून प्रशासनाने उर्वरित काळात वेगाने कामे करण्याची गरज आहे.
बेकायदा कामांमध्ये बड्यांचा समावेश अजिंक्यतारा किल्ल्यावरुन वाहत येणारे ओढे सातारा शहरातूनच जातात. मात्र गोडोली, माची पेठ येथून विसावा नाक्यावरील कर्मवीर कॉलनी, देवी कॉलनी, यशवंत कॉलनी, माने हॉस्पिटलपर्यंत या ओढ्यांची अक्षरशः गटारे झाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्याचे प्रवाह रोखले आहेत. यामुळे रस्त्याच्या एका बाजूस इमारत तर दुसऱ्या बाजूला ओढा वाहत आहे. बेकायदा बांधकामे करणाऱ्यांमध्ये बड्यांचा समावेश आहे. अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याच्या तक्रारी आहेत.
ओढ्याची झाली गटारे
शहरातील सर्व गटारे बंदिस्त करण्यावर भर दिला जात आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव हऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी गटारांवरील लॉफ्ट उघडलेच जात नाहीत. यामध्ये कचरा तुंबून राहिलेला असतो. अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी ओढ्यांचा प्रवाह खंडीत झाला आहे. या खंडीत प्रवाहांमध्ये कचरा, प्लॅस्टिक टाकले जात असल्यामुळे ओढ्यांचीही गटारे झाली आहेत. मुसळधार पावसामुळे या गटारातील आणि ओढ्यांतील पाणी रस्त्यावर येते. पालिकेकडून गटारांची साफसफाई वेळच्या वेळी होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.