ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोशल मीडियावर अनेकदा शालेय किंवा महाविद्यालयीन विदार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र शालेय विद्यार्थीनींच्या भांडणांच्या घटना क्वचितच पाहायला मिळतात. बंगळुरूमधील एका शाळेसमोर काही मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या मुलींपैकी काही शाळेच्या ड्रेसमध्ये तर काही इतर कपड्यांमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ बेंगळुरूचा असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे या मुली का भांडत आहेत हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सोशल मीडियावर लोक मुलींमधील या भांडणाचा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहत आहे. मुलींच्या या भांडणाच्या व्हिडिओखाली लोकांनी अनेक प्रकारचे मीम्स शेअर केले आहेत. शाळेच्या ड्रेसच्या आधारे एका सोशल मीडिया यूजरने म्हटले आहे की, हा दोन वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थिनींमधील भांडणाचा व्हिडिओ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या विद्यार्थिनी रस्त्यावर भांडत आहेत त्यातील एक ग्रृप बंगळुरूमधील प्रसिद्ध बिशप कॉटन गर्ल्स स्कूल गर्ल्स असल्याचे म्हटले आहे.