ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोमवारपासून कर्नाटक स्टेट मँगो डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (KSMDMCL) हे इंडिया पोस्ट यांच्यामार्फत
ग्राहकांना त्यांच्या दारापर्यंत आंबा पोहोच करतील, असे KSMDMCL अधिकाऱ्यांनी सांगितले. KSMDMCL आणि
इंडिया पोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सरू केली असन त्याला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
KSMDMCL चे व्यवस्थापकीय संचालक CG नागराजू म्हणाले, “
आंब्यांच्या ऑनलाइन विक्रीसाठी दोन्ही संस्थांनी वेब पोर्टल (www.karsirimangoes.karnataka. gov.in) सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही या उपक्रमाचा फायदा झाला आहे. 2020 मध्ये राज्यभरातील 35 हजार ग्राहकांना एकूण 100 टन आंब्याचा पुरवठा करण्यात आला आणि 2021 मध्ये उत्पादन कमी असतानाही 79 टन आंबा 45 हजार ग्राहकांना विकण्यात आला. यावरून असे दिसून येतं की, ग्राहक ऑनलाइन शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रतीचे आंबे खरेदी । करण्यास इच्छुक आहेत.”