Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंग11th Admission: अकरावी प्रवेशासाठी 30 मे पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात, दोन टप्प्यात...

11th Admission: अकरावी प्रवेशासाठी 30 मे पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात, दोन टप्प्यात पार पडणार प्रक्रिया

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा अकरावीसाठी (11th class Admission) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी अकरावीमध्ये प्रवेश (FYJC admissions) घेणाऱ्या विद्यार्त्यांना यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 30 मे पासून ऑनलाइन अर्जप्रकिया सुरू होणार आहे. ही अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे.



अकरावी प्रवेशाच्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू होणार आहे. या तारखेपासून FYJC मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आपली नोंदणी सुरू करू शकतील. तसेच दाहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येईल. सध्या 10वीच्या निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी FYJC मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण असेल.



दरम्यान, अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव व्हावा या उद्देशाने सोमवारपासून मॉक राउंड म्हणजेच सराव अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 29 मे पर्यंत सुरू राहिल. मॉक राउंड प्रक्रियेत उमेदवारांसाठी डेमो-लॉगिन प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी 11thadmission.org.in वर लॉग इन करू शकतात आणि त्यांना प्रवेश घेण्याची इच्छा असलेले महाविद्यालय निवडू शकतात. मॉक राउंडनंतर डेमो-लॉगिन डेटा मिटविला जाईल आणि त्यानंतर या प्रक्रियेच्या आधारे उमेदवार 30 मे पासून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -