Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रओव्हरटेकच्या नादात भरधाव बस समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली, 8 प्रवाशांचा मृ्त्यू, 26...

ओव्हरटेकच्या नादात भरधाव बस समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली, 8 प्रवाशांचा मृ्त्यू, 26 जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भरधाव खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात (Bus-track Accident) 8 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 26 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.



कर्नाटक राज्यातील हुबळीजवळ सोमवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण आहे, की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. नॅशनल ट्रॅव्हलची ही बस होती. बस सोमवारी रात्री साडे 12 वाजेच्या सुमारास कोल्हापूरहून बंगळुरूकडे निघाली होती. तप तांदळाची वाहतूक करणारा ट्रक बंगळुरूकडून मुंबईकडे जात होता. बस ओव्हरटेक करत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात ट्रकचालक, क्लिनर आणि बसमधील सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना दोघांनी प्राण सोडला. अपघातातील जखमींना हुबळी येथील केआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.



अपघाताची माहिती मिळताच हुबळीचे पोलिस आयुक्त लभुराम यांनी घटनास्थळाला भेट दिली. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -