ताजी बातमी ऑनलाईन टीम
नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर आणि निळ्या साडी साजश्रुंगार करून सारा तेंडुलकर समोर आली आहे. तिच्या हातात कलश देखील आहे. साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक आणि मराठमोठ्या पहेरावात तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

सारा तेंडुलकरचा हा मराठमोळा लूक चाहत्यांनाही खूप पसंत पडला. तिच्या या लूकसमोर बाकीचे फोटो अक्षरश: फिके पडल्याचे दिसत आहे.
सचिन तेंडुलकर तिच्या कन्येसोबत एका लग्न सोहळ्यात उपस्थित होता. या समारंभात सारा ही करवली म्हणून स्वत: ला मिरवत होती.

मुंबईतील जे डब्लू हॉटेलमध्ये पार पडलेल्या समारंभाचे खास फोटो फोटोग्राफर समीर वसाईकर यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केले आहेत. यात सारा तेंडुलकरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.




