Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगगोंधळात गोंधळ! राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच बत्ती गुल

गोंधळात गोंधळ! राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच बत्ती गुल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्य मंत्रिडळाची बैठक (State Cabinet Meeting) सुरू असताना मंत्रालयात वेगळा गोंधळ उडाला. ऐनवेळी मंत्रालयातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. परंतु त्याचवेळी मंत्रालयातील बत्ती गुल झाली आणि मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा संपर्क तुटला. नेमका विद्युत पुरवठा कशामुळे ठप्प झाला, हे मात्र समजू शकले नाही.


काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मंत्रालयातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर आज, गुरुवारी पुन्हा एकदा मंत्रालयाती विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत ABP माझाने वृत्त दिले आहे. सध्या मंत्रालयातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाला वीज भारनियमनाचा फटका बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या आधी 17 मे रोजी देखील असाच प्रकार घडला होता. अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील बत्ती गूल झाली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात अंधार दाटला होता. जवळपास एक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मंत्रालयासमोर अनेक मंत्र्यांचे निवासस्थाने आहेत. त्याच दिवशी सायंकाळी देखील काही मंत्र्यांच्या बंगल्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -