ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रत्येक मुलाला आई आणि वडिलांचा अर्थात दोघांच्याही प्रेमाची गरज असते, असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीच्या ताब्यात असणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली. यापूर्वी संबंधित खटल्यात कौटुंबिक न्यायालयाने मुलाच्या वडिलांना रात्रभर भेटण्याची परवानगी देण्यात आले होती. त्याविरोधात मुलाची आई न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेली होती.
यावर न्यायालयाने एका बाबीवर जोर म्हटलं की, “मुलांच्या आरोग्यात्मक विकासासाठी आई-वडिलांचे प्रेम, समजूत आणि सोबत गरजेची आहे. यामध्ये आई-वडील दोघांनीही आपली समान जबाबदारी विसरता कामा नये. दोघांनी सोबत असणे एक आदर्श असू शकतो. पण, काही कारणांनिमित्त दोघे वेगळे झालेले असतील. पण, मुलाच्या पालनपोषणाची आणि त्याच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी दोघांनाही पूर्ण करावी लागेल. त्यामुळे प्रत्येक मुलाला आई आणि वडिलांच्या अर्थात दोघांच्याही प्रेमाची गरज असते. दोघा पती-पत्नीनी आपापसातील वाद मिटवून मुलाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.”
सविस्तर प्रकरण असे की, २०१२ मध्ये संबंधित जोडीने लग्न केले. २०१५ मध्ये त्यांना मुलगा झाला. परंतु, २०१६ मध्ये ते पती-पत्नी वेगळे झाले. महिलेने घटस्फोटाची तयारी केली आणि त्यामध्ये मुलाचा ताबा व त्याला सांभाळण्याची रक्कम याची कागदपत्रे होती. मात्र, या खटल्याला विलंब झाला. दरम्यान कौटुंबिक न्यायालयाने १७ ते ३० मे २०२२ या कालावधीत मुलाच्या वडिलास मुलाला रात्रभर भेटण्याची परवानगी दिली. या निर्णयाला मुलाच्या आईने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
olx