Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगसावधान! आता बालकामगार ठेवणाऱ्यांकडून होणार जबर दंडाची आकारणी

सावधान! आता बालकामगार ठेवणाऱ्यांकडून होणार जबर दंडाची आकारणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बालकामगार आढळून आल्यानंतर बालकांना त्यांच्या पालकांकडे सोपवले जाते. मात्र, ही मुले पुन्हा बालकामगार म्हणून कामावर परतत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता यापुढे मुलांना बालकामगार म्हणून कामास प्रवृत्त करणारे मध्यस्थ आणि संबंधित संस्था यांना जबर दंडाची आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी दिली.


बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी शुक्रवारी पुणे दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होत्या. या वेळी अॅड. नीलिमा चव्हाण, अॅड. संजय सेंगर, ॲड. प्रज्ञा खोसरे, अॅड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे आदी आयोगाचे सदस्य या वेळी उपस्थित होते.


शहा म्हणाल्या, ‘बालकामगार आढळून आल्यानंतर त्यांना कामास प्रवृत्त करणारे मध्यस्थ आणि संबंधित संस्थांना जबर दंडाची आकारणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. याशिवाय कोरोनानंतर विनाअनुदानित शाळांमध्ये भरमसाठ शुल्कवाढ करण्यात आल्याच्या तक्रारीही आल्या असून शुल्क वाढवताना पालक-शिक्षक संघाला (पीटीए) विश्वासात घेऊन शुल्कवाढ केली किंवा कसे? याबाबत आयोगाने माहिती मागविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -