ताजी बातमी ऑनलाईन टीम
विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहापूर पोलिस
ठाण्याच्या हद्दीतील अक्षय सावंता नरळे (रा. गणेशनगर) याला १ वर्षासाठी तर योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे (रा. विवेकानंदनगर कोरोची) याला ६ महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
करण्यात आले आहे. या संदर्भातील योगेश कवडे अक्षय नरळे
” प्रस्तावाची पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामनी यांची चौकशी करुन अहवाल उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी प्रस्ताव मंजूर केले. पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनेवरुन शहापूर पोलिसांनी विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय सावंता नरळे व योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे या दोघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन ते पोलिस उपअधिक्षक महामुनी यांच्याकडे पाठविण्यात आले होते.
त्याची चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी डॉ. खरात यांनी नरळे याला १ वर्षासाठी तर योगेश कवडे याला ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय नरळे याच्यावर शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्यात खून, घातक हत्यारासह जाळपोळ, नुकसान, मारामारी असे २ तर योगेश कवडे याच्यावर गावभाग, शिवाजीनगर, हातकणंगले व शहापूर पोलिस ठाण्यात खून, दरोडा, विनयभंग, मारामारी, चोरी व जुगार असे ६ गुन्हे दाखल आहेत. या प्रस्तावाचे विस्तृत काम शहापूर पोलीस ठाण्याचे साजिद कुरणे, व पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे सागर हारगुले यांनी पाहिले.