ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा तर शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwau) यांनी दिली आहे.
यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा विद्यार्थ्यांनाही सर्वात मोठा फटका बसला आहे. अनेक दिवस विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे आता हे नुकसान भरून काढण्याचं तसेच निकाल प्रक्रिया आणि पुढची प्रवेश प्रक्रिया वेगवान बनवण्यावर भर दिला जात आहे.