Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीजुगार अड्ड्यावर छापा; सहा जण अटकेत गावभाग पोलिसांची कारवाई

जुगार अड्ड्यावर छापा; सहा जण अटकेत गावभाग पोलिसांची कारवाई

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लालनगर परिसरातील आरोग्य केंद्राच्या मागे उघड्यावर अंदरबाहर खेळणाऱ्या सहाजणांवर गावभाग पोलिसांनी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ४ हजार ८० रूपये रोख व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शुभम विजय तारळेकर (वय २५,रा.लालनगर), आकाश जनार्दन वायचळ (वय २३, रा.लालनगर), समीर जावेद शेख (वय २३, रा.लालनगर), आकाश शिवाजी आवळे (वय २७), कृष्णा दिपक भोसले (वय २३, रा.लालनगर) व निहाल भुपाल गागडे (वय २५, रा.शांतीनगर) यांचा समावेश आहे.

लालनगर परिसरातील आरोग्य केंद्राच्या मागे उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून वरील कारवाई केली. याबाबत गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पो.ना.वरूटे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -