यादवनगरमध्ये टोळक्याने तलवारीने वाहनांची तोडफोड करत दहशत माजविली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. यामध्ये चार टेम्पो, दोन रिक्षा, दोन मोटारींसह दुचाकींचेही नुकसान झाले आहे. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयितांची धरपकड सुरु आहे.
मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (वय ३५, रा. यादवनगर), शाहरुख मुराद मोमीन (२८, रा. सुभाषनगर) अशी संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, या दोघांसह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मोहसीन मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.






