Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरइर्षेला पेटले दोन कोल्हापूरकर

इर्षेला पेटले दोन कोल्हापूरकर

मुंबईत राज्यसभेची निवडणूक गाजते आहे. कोल्हापूरच्या मल्लांनी या निवडणुकीत चुरस आणली आहे. या राज्यसभा निवडणुकीचे निकालाचे परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील सतेज पाटीलविरुद्ध धनंजय महाडिक ही लढत मुंबईत रंगली आहे.
कागलमध्ये ज्याप्रमाणे पक्ष आणि उमेदवार यापेक्षाही गटांतच चुरस व्हायची.

तीच परिस्थिती आता पाटील-महाडिक गटांत आहे. निवडणूक कोणतीही असो, चुरस या दोन गटांतच असते. आताही राज्यसभेसाठी महाविकास आघाडीविरुद्ध भाजप यापेक्षाही पाटीलविरुद्ध महाडिक असाच सामना आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर या निकालाचा होणारा परिणाम लक्षात घेऊनच सतेज पाटील यांनी सुरुवातीपासूनच सूत्रे स्वतःकडे ठेवली आहेत, तर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाडिक गट ईष्येने या निवडणुकीत उतरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -