Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्र३१ हजारांच्या बनावट नोटा जप्त ; तिघा जणांना अटक

३१ हजारांच्या बनावट नोटा जप्त ; तिघा जणांना अटक

३१ हजारांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केले आहे. यामध्ये शाहीर सुखदेव वाघमारे (वय ३७, रा. तुळशी, माढा, सोलापूर), तानाजी पांडुरंग भोगम (वय ५१, रा. भोगमवाडी, ता. करवीर) आणि अमित मारुती काटकर ( वय ३०, रा. आरळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईमध्ये ३१ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्या तयार करण्यासाठीचे वापरलेले साहित्य जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण पांडुरंग जाधव यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. ते, सध्या फुलेवाडी रिंगरोड येथे राहतात. त्यांच्याकडे संशयित शाहीर वाघमारे कुटुंबासह वीटभट्टीवर कामास होता. या वर्षीचे काम संपल्यानंतर त्याच्याकडे कामाची रक्कम येणे बाकी होती. जाधव व त्याचे या विषयी बोलणे झाले. वाघमारेने पैसे देण्याचे त्यावेळी कबूल केले. त्याने भोगमवाडी येथील वीटभट्टी मालक संशयित तानाजी भोगम याच्याकडून ५० हजारांची रक्कम घेतली. त्याने देणे भागविण्यासाठी ती जाधव यांच्याकडे दिली. त्या रकमेत वाघमारेने ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. या सर्व बनावट नोटा पाचशे रुपयांच्या होत्या. जाधव यांनी २९ मे रोजी यासंबंधी जुना राजवाडा पोलिस ठाण्यांत फिर्याद दिली.

त्यानुसार संशयित वाघमारे आणि भोगम या दोघांना जेरबंद केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव, अंमलदार सतीश बांबरे, हणमंत कुंभार, अनिल ढवळे, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, संदीप माने, अमर पाटील, योगेश गोसावी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -