ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या तीन महिन्यापासून कांद्याचा विषय जरी निघाला तरी दरात घसरणच झाली असणार असे चित्र आहे. यंदा प्रथमच कांद्याचे दर सलग तीन महिने घसरलेले आहेत. दराबाबत लहरीपणा असलेल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्य पाणी आणलंय. पण आता वेळ बदलतेय. कारण चांगल्या प्रतीच्या कांद्याला 16 ते 17 रुपये किलो असा दर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील जन्नुर तालुक्यातील आळेफाटा कृषी उत्पन्न बाजारापेठेत कांदा दरात वाढ झाली आहे. सबंध राज्यात असेच चित्र निर्माण व्हावे अशी अपेक्षा शेतकरी बाळगत आहे. खरिपातील लाल कांद्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याचा उठावच झाला नाही.
पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले आणि बाजारपेठेत कवडीमोल दर. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांनी ८ कांदा फुकटात वाटला पण आता तीन महिन्यानंतर का होईना चित्र बदलत आहे. याची सुरवात पुणे । येथून झाली असली तरी सबंध राज्यात दर वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.