आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. तुरुंगात असलेले महाविकासआघाडीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने नाकारली आहे. या निवडणुकीत एक एक मतासाठी संघर्ष करावा लागत असताना न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीसाला मोठा दणका बसला आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यालयाने त्यांना मतदान करण्यास परवानगी नाकरली आहे. मंत्री नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारीमध्ये अटक केल्यापासून तुरुंगात आहेत. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दोघांनीही एक दिवसाच्या जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती.