ताजी बातमी ऑनलाईन टीम
चंदूर, शाहुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या रागातून जमावाने कपील हातळगी याच्या घराचे कुलूप तोडून घरातील फ्रिज, सोफासेट, टी.व्ही., शिलाई मशिनची तोडफोड करून नुकसान केले.
याप्रकरणी सुप्रिया हातळगी यांच्या फिर्यादीनुसार किरण पडीयार याच्यासह ८ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी संशयीत राहुल दगडू शिंदे वय ३० व तुषार काशिनाथ गोरे वय ३८, दोघे रा. शाहूनगर, चंदूरया दोघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.