ताजी बातमी ऑनलाईन टीम
चरण; येथील सोसायटी निवडणुकीत घोडावली बनशंकरी देवी शेतकरी विकास पॅनेलने 12 जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची लढत होती. भाजप गटाने बाजी मारत 12 उमेदवार निवडून आणले. तर राष्ट्रवादी गटाला एका उमेदवारावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, हणमंत पाटील यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला.
निवडणूक निर्णय अधिकारी यू. एस. वाटेगावकर, ए. डी. लाड, वाय. पी. पाटील, विश्वास पाटील, सुभाष पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच आनंदा कांबळे, माजी सरपंच हिंदुराव नांगरे, एम.एन आवळे, विश्वनाथ देशपांडे, अशोक बेरडे, पोपट गुरव, कैलास पाटील आदी उपस्थित होते.




