Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरजोतिबा डोंगरावर आता माणसी एवढ्या रुपयांचा यात्रा कर

जोतिबा डोंगरावर आता माणसी एवढ्या रुपयांचा यात्रा कर

जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ग्रामपंचायतीने आता माणसी दोन रुपयांऐवजी पाच रुपये यात्रा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एक जुलैपासून हा निर्णय अंमलात येईल. दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातून दरवर्षी लाखो भाविक येत असतात. जोतिबा डोंगरावरील स्वच्छता, पाणी, वीज पुरवठा यासाठी प्रशासनाने यात्रा कराच्या माध्यमातून माणसी कर आकारण्याची तरतूद केली आहे.

भाविकांची वाढती संख्या पाहता जमा होणाऱ्या यात्रा करातून ग्रामपंचायतीला सुविधा पुरवण्यावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे यात्रा कर 2 रुपयांऐवजी 5 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या दोन रुपयेप्रमाणे 50 ते 55 लाख रुपये एवढा कर जमा होत असून ही रक्कम आता दीड कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -