महाराष्ट्रात नुकताच राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात भाजपचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडी तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत ठाकरे सरकारचा भाजपने दारुन पराभव केला आहे. या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपतींनी संत तुकोबांच्या ओवीने ठाकरे सरकारवर मार्मिक ट्वीट करीत टिका केली आहे.
‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा | परि नाही दशा साच अंगीं | तुका म्हणे करी लटिक्याचा सांठा | फजित तो खोटा शीघ्र होय |’, असे संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांच्या उमेदवारीवर संभ्रम होता. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारीसाठी पक्षप्रवेशाची अट घातली. यामुळे संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त करत या निवडणुकीतून माघारी घेतली होती.