Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : बांधकाम कामगाराच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

कोल्हापूर : बांधकाम कामगाराच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गांधीनगर ; बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडून जागीच ठार झालेल्या खताल दरवेशी या परप्रांतीय बांधकाम कामगाराच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना चार दिवसानंतर पुढे आली आहे.



गांधीनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर गडमुडशिंगी हद्दीत हा प्रकार घडला. खताल दरवेशी (वय 50, मूळ गाव चिककंगनोळी, ता. खानापूर, जि. बेळगाव, सध्या रा. स्वामी शांतीप्रकाशनगर, गडमुडशिंगी) हा रेल्वे स्टेशन रस्त्यावरील सुरू असलेल्या एका बांधकामावर काम करत होता.

काम सुरू असताना त्याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्याचे घटनास्थळी भासवण्यात आले; पण सीपीआर पोलिस चौकीमध्ये तशी नोंद दिसून आली नाही. त्याचा मृतदेह कर्नाटकातील चिककंगनोळी येथे नातेवाईकांसमवेत पाठवून तेथेच अंत्यसंस्कार केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -