ताजी बातमी ऑनलाईन टीम
कवलापूर येथे शेतीच्या कारणावरून काठीने व चाकूने मारहाण केल्याबद्दल पाच जनाविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अनिल सुखदेव माने वय 50 वर्षे धंदा शेती राहणार कवलापूर कोंडके मळा हे संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतात गेले असता शेतीच्या कारणावरून त्यांना व त्यांची पत्नी व मुलगा यांना संशयित आरोपी सुनील सुखदेव माने वय 47 वर्ष जोतीराम सुखदेव माने वय 45 वर्ष शुभम सुनील माने वय 19 वर्ष विश्वजीत जोतीराम माने वय 18 वर्ष 5 महिने अथर्व ज्योतिराम माने सर्व राहणार कोंडके मळा कवलापूर यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी व मुलास चाकूने व काठीने मारहाण करून जखमी केले तसेच शिवीगाळही केली.
याबाबत अनिल सुखदेव माने त्यांनी वरील पाच आरोपींच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली असून सदर घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार वंजारी हे करीत आहेत.