ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona Virus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. जगावर आणि देशावर असलेले कोरोनाचे (Covid 19) हे सावट काही संपायचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाचा वेग मंदावला होता पण आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. अशामध्ये केंद्र आणि राज्य सरकार सतर्क होऊन उपाय योजना करत आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 8,582 नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याच दरम्यान, देशात शनिवारी दिवसभरात 4,435 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशामध्ये जवळपास 44,513 कोरोनाचे सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नवीन माहिती जारी केली आहे. गेल्या दोन वर्षांत देशामध्ये कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.