ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार, असा फलक संभाजीराजे समर्थकांनी मुंबईत शिवसेना भवनासमोर झळकावून शिवसेनेला डिवचले आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिनसले आहेत. शिवबंधन बांधण्याचे नाकारून संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपली वाटचाल सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभा निकालानंतर ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. आता त्यांच्या समर्थकांनी मुंबईत शिवसेना भवनासमोर त्याचबरोबर कोपरखैरने येथे फलक लावून आपल्या मनातील व्यथेला वाट मोकळी करून दिली आहे. या फलकाची सर्वत्र चर्चा होती. फलक मुंबईत लावला असला, तरी चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.