Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगआता दहावीचा निकाल SMS द्वारे हि पाहता येणार; सेकंदात Result मिळणार हातात

आता दहावीचा निकाल SMS द्वारे हि पाहता येणार; सेकंदात Result मिळणार हातात

यंदा महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. दरम्यान या परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यावरूनच बराच काळ तर्कविर्तक सुरु होता. मात्र यंदा सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात शिक्षण मंडळ ठाम होते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाचे वेध लागले आहे.

येत्या काही दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र आता निकालासाठी धावपळ नको म्हणून आता विद्यार्थ्यांची दहावीचा निकाल घरबसल्या पाहता येणार आहे. ते ही तुम्हाला आपापल्या मोबाईल वरून. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर एकदम मारा झाल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशावेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय बोर्डाकडून करण्यात आली आहे.

घरबसल्या निकाल नेमका कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in

आणि mahahsscboard.in

या दोन वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.

मात्र, बऱ्याचदा साईट स्लो झाल्याने किंवा नेट उपलब्ध नसल्याने ऑनलाइन निकाल पाहाणं शक्य होत नाही. तर अशावेळी तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकता. तुम्हाला एक SMS करायचा आहे. त्यावर तुमचा सीट नंबर आणि नाव द्यायचं आहे. तुम्ही तो SMS पाठवला की तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारेच पाहता येईल.

या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSCसीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -