Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगशूटरने चौकशीत केला धक्कादायक खुलासा

शूटरने चौकशीत केला धक्कादायक खुलासा

पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन उघड झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी  एकाला पुण्यातून अटक केली आहे. संतोष जाधव असे  अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो शूटर आहे. या शिवाय पोलिसांनी नवनाथ सूर्यवंशी याला देखील ताब्यात घेतले आहे. शूटरने पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे.

सिद्धू मूसेवाला हत्येची जबाबदारी स्वीकारलेल्या लॉरेंस बिष्णोई गँगचे हस्तक महाराष्ट्रभरात पसरले आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या संपर्कात पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे 11 जण कोण? याबात पुणे पोलिस शोध घेत आहेत.

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संतोष जाधन आणि नवनाथ सूर्यवंशी पुण्यातील 2021 मधील मर्डर केसमधील आरोपी आहेत. सिद्धू मूसेवाला हत्येत देखील दोघांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -