ताजी बातमी ऑनलाईन टीम
पिंपरी: आकुर्डी येथील शंकर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका पडक्या रूममध्ये गांजा ओढत बसलेल्या एका तरुणास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (11 रोजी) दुपारी पावणेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश प्रभाकर साबळे यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या वेळी आकाश साबळे यांच्याकडून आठ ग्रॅम वजनाचा दीडशे रुपये किमतीचा गांजा आढळला. निगडी पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.