Tuesday, December 24, 2024
Homeजरा हटकेसावधान, पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत सापासारखे सरपटणारे एलियन्स, वाचा वैज्ञानिक प्राध्यापकांनी...

सावधान, पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत सापासारखे सरपटणारे एलियन्स, वाचा वैज्ञानिक प्राध्यापकांनी काय दिलाय आश्चर्यजनक इशारा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन – गेल्या अनेक वर्षांपासून परग्रहावर असलेल्या मानवी वस्तीच्या आणि जीवनाच्या शोधात मानव आहे. मात्र एका प्राध्यापकाने आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. क्वीसलँड विद्यापीठात तत्वज्ञानात पीएचडी करणारे प्राध्यापक डॉ. मायकल सल्ला यांनी दावा केला आहे की, एक आक्रमक सरपटणारी प्रजाती ही मानवावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नात आहे. संपूर्ण देशात फॅसिस्ट कायद्याची व्यवस्था स्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.



काय आहे या प्राध्यापकांचा सविस्तर दावा
परग्रहवासी किंवा एलियन्स मानवाच्या राजकारणाला कसे प्रभावित करु शकतील, यावर प्राध्यापक मायकल सल्ला यांचे अध्ययन सुरु आहे. एलियनशी संबंधित विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि आश्चर्यचकित करणारी त्यांची थियरी त्यांनी जगासमोर मांडलेली आहे. जेसल यू ट्यूब चॅनेलवर झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी नवी माहिती दिली आहे. यात त्यांनी दावा केला आहे की अनेक परग्रहवासी प्रजाती अशा आहेत की ज्या मानवांच्या संपर्कात आहेत. या परग्रहवासियांनी इशारा दिला आहे की, सरपटणारे परग्रहवासी पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -