Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रटोपीवरुन २४ तासांत खुनाचा उलगडा; आरोपीस अटक

टोपीवरुन २४ तासांत खुनाचा उलगडा; आरोपीस अटक

डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी साक्षीदाराची टोपी पडली होती. टोपी हाच मुख्य धागा पकडून विष्णूनगर पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक केले आहे. अर्जुन आनंदा मोरे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. तर तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या डोंबिवली येथील बावनचाळ या परिसरात राहतो.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीच्या पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा पंटनामा केला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

तपासादरम्यान बावनचाळीत खून झाला होता तेथे ठिकाणी साक्षीदारांची टोपी पडलेली पोलिसांना सापडली होती. नेमका हाच धागा पकडून सीसीटिव्हीद्वारे तपासास सुरूवात केली. याच दरम्यान पोलिसांनी टोपीला मिळती जुळती टोपी कोणी घातली आहे याचा अंदाज घेत साक्षीदाराला शोधून काढले. त्यानंतर साक्षीदाराने दारू पिऊन ही मारामारी झाली असून आरोपीचे नाव सांगितले.

यानंतर डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानाजवळ आरोपी अर्जुन आनंदा मोरे येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर भागशाला मैदानाजवळ सापळा रचून त्याला अटक केली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे आणि मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. आर वडणे आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी या गुन्ह्याची उकल केली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -