Tuesday, July 8, 2025
Homeसांगलीसासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील आगळगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे असलेले अनैतिक संबंध व माहेरहून सोने पैसे आणण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास या सगळ्याला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या प्रकरणी महिलेचा पती, सासू,सासरे व नणंद या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती व सासरे या दोघांना अटक केली आहे.

अंकिता प्रमोद पाटील असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव होते. तिने शनिवारी शेतातील सामुदायिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रविवारी तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी विवाहितेचे वडील अनिल भागवत पवार रा. संजयनगर, सांगली यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आगळगाव येथील गावाच्या पश्चिमेकडील बाजूला पाटील वस्ती आहे. वर्ष 2016 मध्ये अंकिता हिचा विवाह प्रमोद पाटील यांच्याबरोबर झाला होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. विवाहानंतर एक वर्ष चांगले गेले. त्रास वैगरे काहीच नव्हता.

परंतु त्यानंतर माहेरहून दोन तोळे सोने व रोख 50 हजार रुपये घेवून ये. तसेच विवाहितेला स्वयंपाक व्यवस्थित येत नाही, या कारणावरून सासरच्या मंडळींकडून वारंवार शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याचा कारणातून तिने हि आत्महत्या (Sucide) केल्याचे मृत महिलेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच 2017 पासून आपल्या मुलीला शारिरीक व मानसिक त्रास होत आहे व पती प्रमोद पाटील यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे देखील त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तातडीने कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -