Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सोळा मुलांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

कोल्हापूर : सोळा मुलांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; जिल्ह्यातील सहा वर्षांपर्यंतच्या 16 मुलांवर मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याकरिता या मुलांना जिल्हा परिषदेच्या वतीने मुंबईला स्वतंत्र बसमधून पाठविण्यात आले. या मुलांची व त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांचा मोफत प्रवास, भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनवेळा तर शालेय विद्यार्थ्यांची तपासणी वर्षातून एकदा केली जाते. यामध्ये हृदयरोग तसेच अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.

अंगणवाडी सेविका, आशा यांच्या मदतीने रुग्णांची यादी तयार केली जाते. हृदयरोग संशयित बालकांसाठी 2 डी इको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 16 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बसमध्ये बसताना मुलांच्या पालकांनी दोन्ही हात जोडून प्रशासनाचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -